अवसरी :'दूरदर्शन' व 'आय.आय.टी. दिल्ली तर्फे येथे आयोजित करण्यात आलेल्या "ए बी यू राष्ट्रिय रोबोकॉन २०२१ "स्पर्धेत शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी (खुर्द) ने उत्कृष्ट असे प्रदर्शन करून संपुर्ण भारतातुन सहावा आणि महाराष्ट्र राज्यातुन द्वितीय क्रमांक पटकावला आहे . तसेच महाविद्यालयाने प्रथम आणि द्वितीय टप्प्यात १०० टक्के गुण प्राप्त करून घवघवीत यश प्राप्त केले. सदर स्पर्धा दि. १८ ऑगस्ट २०२१ रोजी आय. आय. टी दिल्ली तर्फे भरवण्यात आली होती, या स्पर्धेमध्ये देशातील नामांकित ६० अभियांत्रिकी महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता.
ए बी यू रोबोकॉन २०२१ चे आंतरराष्ट्रीय आयोजक यांनी दिलेली थिम ही स्वयंचलित बाणफेकण्याची यंत्रणा तयारकरणे यावर आधारीत होती .व नियमानुसार, स्पर्धेकरीता संघाने दोन रोबोट थ्रोविंग रोबोट आणि ऍरोकीड रोबोटबनविले होते. त्यापैकी थ्रोविंग रोबोटवर " स्वयंचलित बाण फेकण्याच्या यंत्रणेमध्ये, मेकॅनम व्हील, न्यूमॅटिक ग्रिपर,बेल्ट ड्राइव्ह, डिस्टन्स सेन्सर इत्यादी. सेन्सर्स व अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक सिस्टिमचा " उपयोगकरण्यातआला . तसेच ऍरोकीड रोबोटवर लोकोमोशन साठी "स्वयंचलित स्वर्व ड्राईव्ह,स्वयंचलित बाण फेकण्याची यंत्रणा, डिस्टन्स सेन्सर,एन्कोडर, अरेनावरून बाण उचलणे इत्यादी यंत्रणांचा उपयोग केला होता. दिलेले कार्य दोन्ही रोबोट ने ३मिनिट मध्ये ३२ गुण प्राप्त करत पुर्ण केले. सध्याच्या कोविड -१९ महामारीच्या परिस्तिथीत सर्व सावधानी बाळगत संघाने सदर रोबोटसाठी लागणारे १ वर्षाचे काम,४ महिन्याच्या कालावधीत पूर्ण करून स्पर्धेत यश संपादित केले .
संघाचे नेतृत्व हर्षवर्धन लोखंडे याने केले असुन रोबोटचे ऑपरेटर कुणाल खैरनार आणि मंदार डाळिंबे होते, तसेच त्यांसोबत मदतीला मधुकर गवनी,सत्यजित नलवडे,धनंजय तनपुरे,ज्ञानेश्वर शिंदे,स्वप्निल पारधी,प्राजक्ता खैरमोडे,सुशांत फलके,स्वरांगी ठाकरे,अथर्व तोरडमल, मधुरा हांडे-देशमुख होते.
संघामध्ये विविध शाखेचे एकूण ३८ विद्यार्थी सहभागी होते.केलेल्याउत्कृष्ट कामगिरी साठी प्राचार्य श्री.एस.व्ही.जोशी व माजी प्राचार्य डॉ.ए.एस.पंत यांनी संघाचे अभिनंदन केले आहे. संघ समन्वयक डॉ.सी. एम .शेवतकर आणि श्री. जी. एस. दातार यांचे संघाला मोलाचे मार्गदर्शन लाभले.
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                    Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
Website last updated on: